जॉन सीनाने शेअर केला ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा फोटो

जॉन सीनाचे विदेशात तसेच भारतातही चाहत्यांची संख्या अधिक आहे. जॉन सीना सध्या इंस्टाग्रामवरील पोस्टवरून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने अभिषेक आणि अमिताभ बच्चन यांचा फोटो शेअर केला होता आणि जेव्हा अशी बातमी आली की ऐश्‍वर्या राय-बच्चनसुद्धा करोना पॉझिटिव्ह आहे तेव्हा जॉन सीनाने ऐश्‍वर्याचा फोटोही इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला.

अमिताभ आणि अभिषेक यांच्यावर चाहत्यांनी सोशल मीडियावर बरे होण्यासाठी प्रार्थना केली होती. तर जॉन सीनाने या दोघांचा फोटो शेअर केला. आता जॉन सीनाने ऐश्‍वर्याचा पोस्ट केलेल्या फोटोला 12 हजारांपेक्षा अधिक कमेंट मिळाल्या आहेत आणि 6 लाख पेक्षा अधिक लोकांनी लाइक केले आहे.

भारतात जॉन सीनाचे लाखो फॉलोअर्स आहेत. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत जॉन सीनाची क्रेझ आहे. या कारणामुळेच जॉन सीना आपल्या सोशल अकाउंटवर भारतासंबंधी फोटो आणि पोस्ट शेअर करत असतो.

जॉन सीनाने सुशांत सिंह राजपूत, इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या निधनानंतर त्यांचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. याशिवाय रणवीर सिंग आणि शिल्पा शेट्टी यांचेही फोटो जॉन सीनाने शेअर केले आहेत. जॉन सीनाचे इंस्टाग्रामवर 14.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. मात्र जॉन सीना आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून कुणालाही फॉलो करीत नाही.

 

You might also like