ऐश्वर्या व आराध्या बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

ऐश्वर्या व आराध्याचा कोरोना रिपोर्ट हा १२ जुलै रोजी पॉझिटिव्ह आला होता. तेव्हा या दोघींनी घरातच क्वारंटाइन करण्यात आलं होतं. मात्र एका आठवड्यानंतर दोघींनाही नानावटीमध्ये दाखल करण्यात आलं. आता कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे तर या दोघींना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून अभिषेक बच्चनने ट्विटरवर याविषयीची मााहिती दिली. त्याचसोबत त्याने ट्विटरवर चाहत्यांचे आभार मानले.

‘तुम्ही सातत्याने करत असलेल्या प्रार्थनांसाठी तुमचे खूप खूप आभार. मी तुमचा कायम ऋणी आहे. ऐश्वर्या आणि आराध्या यांचा रिपोर्ट सुदैवाने निगेटिव्ह आला असून त्यांचा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळत आहे. ते आता घरी राहतील. मी आणि बाबा अजूनही रुग्णालयातच राहणार आहोत’, असं ट्विट अभिषेकने केलं.

दरम्यान, अमिताभ बच्चन व अभिषेक यांच्यावर नानावटीमध्ये अजूनही उपचार सुरू आहेत. कालच अमिताभ बच्चन यांनी रुग्णालयातून एक पोस्ट शेअर केली होती. कोरोना रुग्णांवर कसे उपचार केले जातात, याची माहिती त्यांनी पोस्टमधून दिली होती. ‘कोरोना रुग्णांना रुग्णालयात वेगळ्या वॉर्डमध्ये ठेवण्यात येतं. त्यामुळे तो कित्येक दिवस इतरांना पाहू शकत नाही. डॉक्टर आणि परिचारिका येतात. औषधं देतात. मात्र ते कायम पीपीई किटमध्ये असतात. कोणत्याही रुग्णाला त्याच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा चेहरा पाहता येत नाही,’ अशा शब्दांत अमिताभ यांनी त्यांचा अनुभव शेअर केला होता.

You might also like