AIIMS च्या रिपोर्टवर सुशांतची बहिण म्हणते…

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाला रोज वेगळं वळण मिळत असताना एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला असून सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

दरम्यान या रिपोर्टवर सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्ती हिने प्रतिक्रिया दिली आहे. ‘आम्ही जिंकू’ हे दोन शब्द ट्विट करुन तिने सुशांतला न्याय देण्यासाठी सुरु असलेल्या प्रक्रियेवर विश्वास व्यक्त केला आहे. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

एम्स डॉक्टरांनी दिलेली माहिती आणि सीबीआय तपासात समोर आलेल्या गोष्टी एकत्र करुन पडताळून पाहिल्या जात आहेत. सूत्रांनुसार, एम्सच्या डॉक्टरांनी दिलेली माहिती तज्ञांचं मत म्हणून ग्राह्य धरलं जाणार असून त्यांना साक्षीदार म्हणूनही उभं केलं जाऊ शकतं.

You might also like