आई कोरोनामुक्त झाल्यावर अनुपम खेर यांनी मानले चाहत्यांचे आभार

गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगला घातलेला विळखा हा वाढतच आहे. बॉलिवूड कलाकार यांच्यापासून ते अनेक राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. तसेच अनेकजण कोरणमुक्त देखील झाली आहेत, नुकतेच बॉलिवूडचे ज्येष्ठ नेते अनुपम खेर यांच्या आईलाही कोरोनाची लागण झाली होती. इतकेच नाही तर त्यांचा भाऊ, वहिनी आणि पुतणीलाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. पण आता अभिनेते अनुपम खेर यांची आई दुलारी खेर यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे, असे स्वताः हा अनुपम यांनी एका व्हिडीओद्वारे आपल्या चाहत्यांना ही बातमी दिली.

अनुपम यांनी एक व्हिडीओ शेअर करत याबद्दल आनंद व्यक्त केला. सोबत डॉक्टर्स, मुंबई महापालिका आणि चाहत्यांचे आभार मानलेत. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, ‘माझ्या आईला वैद्यकीय मापदंडानुसार स्वस्थ घोषित करण्यात आले आहे. आता ती घरी होम क्वारंटाईनमध्ये राहिल. सुरक्षित राहा. कोरोना रूग्ण आणि त्यांच्या कुटुंबापासून भावनिक अंतर राखून त्यांना वाळीत टाकू नका. ‘ ज्यांच्या घरात कोरोना रुग्ण आहेत, त्यांना एकाकी वाटते. मात्र ते एकटे नाहीत आम्ही त्यांच्या सोबत आहोत. डॉक्टर्स आणि बीएमसीचे कर्मचारी खरे हिरो आहेत’.

दरम्यान, गेल्या 12 जुलैला अनुपम खेर यांनी त्यांच्या कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी दिली होती. अनुपम यांची आई, भाऊ राजू खेर, वहिनी रीमा आणि पुतणी वृंदा यांना कोरोना झाला होता. यानंतर या सर्वांवर आठवडाभर उपचार सुरु होते. आता मात्र सर्वजण ठणठणीत बरे झाले आहेत.

 

You might also like