९६ मुलींच्या ऑडिशन्स घेतल्या नंतर दिप्ती सती ठरली संजय जाधवची लकी गर्ल

संजय जाधव येत्या 7 फेब्रुवारीला ‘लकी’ ही धमाल कॉमेडी चित्रपट घेऊन येत आहे. ह्यावेळी सई, तेजस्विनी सारख्या हिरोइन्सना डावलून दिप्तीचीच निवड का केली? असं विचारल्यावर संजय जाधव म्हणाला, “कोणाला डावलण्यात आलं नाही आहे. सई,तेजस्विनी आणि ह्या अगोदर माझ्यासोबत काम केलेल्या सर्वच नायिका माझ्या फेव्हरेट आहेत आणि राहतील. पण आता सई किंवा तेजस्विनीला कॉलेजला जाणारी मुलगी दाखवलं तर ते त्यांच्या वयाला अनुरूप होणार नाही. ह्याअगोदर त्यांनी माझ्यासिनेमातच कॉलेज-गोइंग मुलींचे सिनेमे केले आहेत. मग त्यांच्या भूमिकांमध्येही तोच-तोपणा प्रेक्षकांना जाणवण्याची शक्यता आहे. आजपर्यंत मराठीत कधीही न पाहिलेला फ्रेश फेस ह्या भूमिकेला हवा होता. त्यामुळे दिप्तीची निवड करण्यात आली.”
दिप्तीची निवड करण्याअगोदर जवळ-जवळ 96 मुलींच्या ऑडिशन्स झाल्या होत्या. आणि मग दिप्तीची निवड झाली, असं सूत्रांनूसार समजतंय. ह्या बातमीला दुजोरा देताना संजय जाधव म्हणतो, “हो, आम्ही खूप मुलींच्या ऑडिशन्स घेतल्या. पण काही-ना-काही कारणांनी त्या मुली ‘जिया’च्या भूमिकेला फिट बसत नव्हत्या. पण एकेदिवशी माझ्या असिस्टंटने मला जॅग्वार फिल्म दाखवली. आणि मला जिया सापडली. ”
महत्वाच्या बातम्या –
- शाहरूख खानने नाकारली करणची ‘कॉफी’….!
- ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ ने रचला एक नवा रेकॉर्ड
- आई अमृता सिंगच्या ‘या’ दोन सिनेमात सारा अली खानला करायचंय काम
- ‘बाहुबली’मधील ‘हा’ अभिनेता झळकणार हॉलिवूड मध्ये ?