प्रिया बेर्डेनंतर मराठीतील ‘ही’ अभिनेत्री करणार राष्ट्रवादीत प्रवेश!

प्रिया बेर्डे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री सविता मालपेकर या देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत त्या राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या मनगटावर बांधणार आहेत.
सविता मालपेकर यांच्याबरोबर अभिनेत्री अर्चना नेवरेकर आणि अभिनेते-गीतकार बाबा सौदागर, राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत येत्या काही दिवसांत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम सोहळा पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक सेलचे प्रदेश कार्याध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी या पक्षप्रवेशाबद्दल माहिती दिली आहे.
‘काकस्पर्श’ या मराठी चित्रपटातील त्यांचा अभिमान प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. तसंच ‘गाढवाचं लग्न’ या नाटकातील त्यांची भूमिका प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून आहे.
प्रिया यांच्यासह सिध्देश्वर झाडबुके, लावणीसमाज्ञी शकुंतला नगरकर, सुहासिनी देशपांडे,विनोद खेडेकर, डॉ सुधीर निकम, निर्माते संतोष साखरे मिलिंद आष्टेकर या मंडळींचाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.