अरे व्वा ! मोदींनंतर बिअर ग्रील्ससोबत दिसणार आता अक्षय कुमार !!

बॉलिवूडमध्ये अभिनेता अक्षय कुमारने संपूर्ण चित्रपटसृष्टीत ‘खतरोंके के खिलाडी’ अशी ओळख निर्माण केली आहे. त्याचप्रमाणे जगात कुठल्याही जंगलात किंवा पाण्यात निर्भीडपणे वावरणारा बिअर ग्रील्स. आता अक्षय कुमार लवकरच ‘इंटू द वाईल्ड विद बिअर ग्रील्स’ या कार्यक्रमात दिसणार आहे.अक्षय कुमारने या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार बिअर ग्रील्ससोबत जंगलात फिरताना दिसत आहे. या एका मिनिटाच्या व्हिडिओत अक्षय कुमार हेलिकॉप्टरमधून येताना दिसत आहे. यात ते दोघे पाण्यात पोहताना, रस्सीवर लटकताना तसेच प्राण्यांचा सामना करताना दिसत आहे.

 

You might also like