कंगनानंतर मनिष मल्होत्रा आता BMC च्या रडारवर

अभिनेत्री कंगना रनौतच्या पाली हिलमधील ऑफिसवर कारवाई केल्यानंतर आता बॉलिवूडचा फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा मुंबई महापालिकेच्या रडारवर आहे. आपली रहिवासी जागा बेकायदेशीरपणे व्यावसायिक मालमत्तेत रुपांतरित केल्याबद्दल BMCने मल्होत्राला नोटीस बजावली आहे.

कंगनाच्या कार्यालयापासून काही अंतरावर असलेल्या मनिष मल्होत्राच्या बंगल्यातील बांधकामांवर महापालिकेने आक्षेप नोंदवला आहे. मनिषला ‘कारणे दाखवा’ नोटिशीला उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.

व्यावसायिक वापरासाठी बीएमसीची परवानगी आवश्यक असते आणि त्यासाठी काही रक्कम भरणेही अनिवार्य असते, परंतु मनिष मल्होत्राने ना बीएमसीकडून कोणती परवानगी घेतली, ना कुठलेही पैसे जमा केले.

एमएमसी कायद्याच्या कलम 342 आणि 5 345 अन्वये मनिष मल्होत्राला नोटीस पाठवली आहे. बेकायदा बांधकामे का पाडली जाऊ नये, यावरील त्याचे स्पष्टीकरण असमाधानकारक असल्यास कलम 475 अ अन्वये खटला चालवण्यास तो पात्र असल्याचे नोटिशीत लिहिले आहे.

You might also like