मुंबईत आल्यानंतर कंगनाचं थोबाड फोडू….

अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरणी सातत्याने भाष्य करत असलेली अभिनेत्री कंगना राणावत मुंबईत आली तर आमच्या रणरागिणी तिचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही अस शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी ट्विटरद्वारे म्हटलंय.

कंगनाला खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दात समज दिली आहे. ती मुंबईत आली तर आमच्या रणरागिणी तिचं थोबाड फोडतील, उद्योजक व सेलिब्रिटी घडवणार्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगणावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे करणार आहे, अस म्हणत त्यांनी कंगणावर निशाणा साधला.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राबाहेरील सरकारकडे सुरक्षेची मागणी केल्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून संजय राऊतांनी कंगनावर आखपाखड केली होती.सुशांतसिंगच्या प्रकरणानंतर कंपनाने बॉलिवूडमधील काही मोठ्या दिग्दर्शक आणि अभिनेत्यांंविरोधात उघडपणे बोलायला सुरूवात केल्यानंतर तिने सुरक्षा मागितली होती.दरम्यान बॉलिवूडमधील मोठे अभिनेते, दिग्दर्शक, अभिनेत्री ड्रग्जचं सेवन करत असल्याचा गौप्यस्फोट केला होता.त्यावरून आता वादंग सुरू झाले आहे.कंगणाने सुशांतसिंग प्रकरणावरुन सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्तीवर सुद्धा आरोप केले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री कंगनाने अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. यामध्ये ‘तनू वेड्स मनु’,’मणिकर्णीका’, ‘क्विन’, ‘क्रिश 3’ अशा अनेक चित्रपटांंमध्ये तिने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपूर्वी कंगना राणावतने एक वादग्रस्त ट्विट केले होते, ज्यामध्ये मला बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते अशी टीका केली होती. यानंतर नेटिझन्सने तिला चांगलेच धारेवर धरल्याचे दिसून आले.

You might also like