अखेर कार्तिक सारासोबत डेटला जाण्यासाठी तयार….!

सारा अली खानने जेव्हापासून कार्तिक आर्यनसोबत डेटला जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे, तेव्हापासून कार्तिकला प्रत्येक मुलाखतीत हाच प्रश्न विचारला गेला आहे. काही दिवसांपूर्वी कार्तिकला अनन्या पांडेसोबत डेटला गेल्याचेही फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळे त्याने साराला नकार दिला की काय अशी चर्चा होती. इतकंच काय तर आईने मला आता कार्तिकला मेसेज करू नकोस असंही दटावल्याचं साराने सांगितलं होतं. या सर्व गोष्टींनंतर अखेर कार्तिक सारासोबत डेटला जाण्यासाठी तयार झाला आहे.

‘आता तू आणखी मागे नको लागूस असं साराच्या आईने तिला म्हटल्याचं मी वाचलं होतं. मी उत्तर देणं त्यांना अपेक्षित होतं आणि माझं उत्तर हेच आहे की मी सारासोबत कॉफी डेटला जाण्यासाठी तयार आहे. तिने फक्त कधी आणि कुठे ते मला सांगावं,’ असं तो नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाला.

महत्वाच्या बातम्या –

You might also like