40 दिवसांच्या मेहनतीनंतर हुमा कुरेशीला मिळाला ‘हा’ रिझल्ट

लॉकडाउनमध्ये असल्यामुळे सर्व कलाकार घरी फिटनेससाठी वर्कआउट्स, जिम करत आहेत. अभिनेत्री हुमा कुरेशीनेही स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी या दिवसांत खूपच घाम गाळला आहे. तिने नुकताच एक फोटो शेअर केला आहे, ज्यात ती आपले मसल्स फ्लॉन्ट दाखविताना दिसते.
यात त्यांनी सांगितले की, 40 दिवसांच्या मेहनतीनंतर हा रिझल्ट मिळाला आहे. हुमाने पोस्टमध्ये लिहिले की, पहिल्यापासून आरोग्यदायी आणि सडपातळ असलेल्या मुलीला यापेक्षा अधिक काय हवे. लालेलाल चेहरा आणि धावताना वाढलेले हृदयाचे ठोके मी गेली 40 दिवस अनुभवत आहे.
यासोबतच हुमाने तिच्या प्रशिक्षकाचे आभार मानत लिहिले की, या लॉकडाऊनमध्ये प्रशिक्षण घेत निरोगी राहण्यासाठी मदत केल्याबद्दल थॅंक्यू @sohrabk82. एक सुंदर कम्युनिटी तयार केल्याबद्दल आणि माझ्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे दिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या प्रत्येक वर्कआउट पोस्टमध्ये ही पोझ आहे.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास हुमा कुरेशीला अखेरच्या वेळी “लीला’ वेब सीरिजमध्ये पाहिले होते. तसेच नुकताच रिलीज झालेल्या नवाजुद्दीन सिद्दीकी “घुमकेतू’ चित्रपटातही तिने खास भूमिका साकारली होती. आगामी प्रोजेक्ट्समध्ये हुमाचे नाव अक्षय कुमारच्या “बेल बॉटम’ या चित्रपटात हुमा झळकणार आहे.