आफताबने दिली गुडन्यूज, घरी चिमुकलीचं आगमन

1999 साली ‘मस्त’ सिनेमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारा बॉलिवूड अभिनेता ‘आफताब शिवदासानी’ बाबा झाला आहे. त्याच्या पत्नीने म्हणजेच, निन दुसांज ने एका चिमुकलीला जन्म दिला आहे.  त्यामुळे सध्या आफताब प्रचंड खुश आहे. आफताब आणि निन दुसांज पहिल्यांदाच आई-बाबा झाल्यामुळे त्यांनी हा आनंद आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

नुकतंच, आफताबने आपल्या सोशल मीडियावरून आपल्या बाळाच्या पायांचा फोटो शेअर केला आहे. आफताब आणि निन यांनी 2014 मध्ये लग्नगाठ बांधली होती. आफताबचा पडद्यावरील वावर कमी झाला असला तरी सोशल मीडियावर जबरदस्त सक्रिय असतो. ‘आवारा पागल दिवाना’, ‘आंखे, ‘मस्ती’ अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये त्याने काम केलं आहे.

You might also like