कौतुकास्पद : पोलिसांच्या मदतीला पुन्हा एकदा धावला रोहित शेट्टी

करोनाच्या संकटकाळात देशभरातील अनेक सेलेब्रिटीज मदतीसाठी पुढ़ सरसावलेले दिसुन आलेत. त्यात रोहित शेट्टी ही मागे नाही, करोना परिस्थितित पोलिसांवर मोठी जबाबदारी आहे. मुंबईतील पोलिसांवरही कामाचा प्रचंड ताण आहे.

याच मुंबई पोलिसांच्या मदतीला चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी धावून आला आहे.दिवसरात्र कार्यरत असणाऱ्या पोलिसांसाठी रोहित शेट्टी यांनी शहरात ११ हॉटेल्सची व्यवस्था केली आहे. त्याच्या या मदतीसाठी मुंबई पोलिसांनी ट्विट करत त्याचे आभार मानले आहेत.

मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून रोहित शेट्टीचे आभार मानले आहेत. ‘या करोनाच्या संकटात खाकी वर्दीतल्या योद्धांना मदतीचा हात दिल्याबद्दल धन्यवाद’, असं त्यांनी म्हटलंय. या पूर्वीही जेव्हां रोहित शेट्टीने मुंबईत ८ होटेल्स दिली होती, तेव्हादेखील मुंबई पोलिसांनी रोहित शेट्टीचे ट्विटरद्वारे आभार व्यक्त केले होते. कामावर असलेले, मात्र विश्रांतीची गरज असलेले पोलिस या हॉटेल्समध्ये जाऊन थोडा आराम करू शकतात. या हॉटेल्समध्ये पोलिसांच्या नाश्ता आणि जेवणाची सोयही रोहितने केली आहे.

 

You might also like