…..म्हणून आयुष्मान खुराणा आपल्या मुलांना त्याचे चित्रपट पाहण्याची परवानगी देत नाही

आयुष्मान खुराणाने गेल्या सात वर्षांमध्ये कलाविश्वात स्वत:च स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. अंधाधुन’ आणि ‘बधाई हो’ या चित्रपटांच्या यशानंतर त्याचा समावेश ए लिस्ट कलाकारांच्या यादीमध्ये झाला. त्यामुळेच आज त्याचे लाखो चाहते असून त्याचे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.

असं असताना मात्र आयुष्मान त्याच्या मुलांना त्याचे चित्रपट पाहण्याची परवानगी देत नाही. आपल्या मुलांना चित्रपट पाहण्याची परवानगी न देण्यामागेदेखील एक खास कराण असल्याचं त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

“माझ्या मुलांनी वरुण धवन, रणवीर सिंह किंवा अन्य कोणत्याही कलाकारांचे चित्रपट पहावेत. मात्र माझे चित्रपट पाहण्यास मी त्यांना परवानगी देत नाही. आजच्या काळात प्रत्येक चित्रपटामध्ये किसिंग सीन असतात. हा कामाचा एक भाग असल्यामुळे मलादेखील काही वेळा असे सीन द्यावे लागतात. त्यामुळे आपल्या पित्याला दुसऱ्या कुण्या महिलेसोबत किसिंग सीन देताना मुलांनी पाहणे, माझ्या मते योग्य नाही. त्यांनी माझ्याशी एका स्टारप्रमाणे वागावे, हेही मला मान्य नाही. त्यामुळेही मी त्यांना माझे चित्रपट पाहण्यास मनाई केली आहे”, असं आयुष्मान म्हणतो.