मराठमोळी अभिनेत्री शिल्पा शिंदेचा राजकारणात प्रवेश

मराठमोळी अभिनेत्री आणि ‘बिग बॉस’च्या दहाव्या पर्वाची विजेती ठरलेली शिल्पा शिंदेने राजकारणात पाऊल ठेवलं आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत शिल्पा शिंदेने काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
‘भाभी जी घर पर है’ या मालिकेतील अंगुरी भाभीच्या व्यक्तिरेखेमुळे शिल्पा शिंदे प्रसिद्धीच्या झोतात आली होती. त्यानंतर बिग बॉसच्या दहाव्या पर्वात प्रवेश केल्यावर ती अनेक प्रेक्षकांची फेवरेट ठरली होती.
शिल्पा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस प्रवेश करत असल्यामुळे ती निवडणुकांच्या रिंगणात उतरणार, की स्टार प्रचारक होणार, हे येत्या काळात समजेल. मात्र काँग्रेस तिच्या लोकप्रियतेचा लाभ करुन घेणार, यात शंका नाही.
महत्वाच्या बातम्या –