अभिनेत्री सायली संजीव शिकतेय हे वाद्य

लॉकडाउनच्या काळात मिळालेल्या वेळेत नवनवीन गोष्टी काहींनी शिकल्या. नुकतीच चित्रीकरणाला हळूहळू सुरुवात होत आहे. अभिनेत्री सायली संजीवनेही मिळालेल्या वेळेचा सदुपयोग केला आहे. हार्मोनियम अर्थात पेटी हे वाद्य ती शिकतेय.
सायलीने तिचे पेटी वाजवतानाचे काही व्हिडीओही पोस्ट केले आहेत. या व्हिडीओत ती पेटी वाजवताना दिसत आहे. ‘विठू माऊली तू’ हे भक्ती गीत तिने या पेटीवर वाजवलं आहे.