‘या’ अभनेत्रीला आली सुशांत सिंह राजपूतची आठवण

सुशांत सिंह राजपूत आणि संजना सांघी यांचा दिल बेचारा २४ जुलैला हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाबद्दल चाहते आणि संपूर्ण टीम खूप उत्सुक आहे. सुशांत सिंह राजपूतचा हा शेवटचा चित्रपट आहे. तर दिल बेचारा चित्रपटाच्या रिलीज होण्याच्या एक आठवड्याअगोदर संजनाने सोशल मिडियावर सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत एक पोस्ट शेयर केली आहे.

संजनाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सुशांत सोबत एक फोटो शेयर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, माझ्या चंद्रा, मी तुझा राहिलो, मला विश्वास होत नाही आहे कि चित्रपटाच्या प्रदर्शनाला आता फक्त एक आठवडा राहिला आहे. मी आमच्या दोघांच्या स्पेशल आठवणीला आपल्या सोबत शेयर करत आहे. हा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा आम्ही २०१८ मध्ये चित्रपटाची शुटींग सुरु केली होती. हा फोटो शुटींगच्या पहिल्या आठवड्यातला आहे.

चाहत्यांना हा चित्रपट विनामुल्य पाहता येणार आहे. सुशांत सिंह राजपूतचा हा शेवटचा चित्रपट असल्याने त्याच्या चाहत्यांचा भावना या चित्रपटाशी जोडल्या गेल्या आहेत. संजनाने पुढे लिहिले आहे कि, आम्ही दोघे खूपच खुश होतो कारण आम्ही एक खूपच अवघड सीन पूर्ण केला होता. यामध्ये आमचे समाधान दर्शवत आहे. या सर्व आता भावनिक आठवणी आहेत. सुशांतने मुंबई येथील बांद्रा स्थित आपल्या राहत्या घरी १४ जूनला आ त्म ह त्या केली होती. सुशांत डि प्रे श नचा शिकार होता. टीव्हीपासून अभिनय जगतामध्ये पाऊल ठेवलेल्या सुशांतने शुद्ध देसी रोमांस, राबता, छिछोरे, केदारनाथ आणि सोनचिड़िया सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या उत्कृष्ठ अभिनयाचे प्रदर्शन केले होते.

You might also like