….म्हणून शूटींग सुरु असतांनाच प्रिया बापट घाबरून पळाली

प्रिया बापट ही नेहमीच आपल्या सिनेमांतील व्यक्तिरेखांमधून चाहत्यांची मनं जिंकते. तिचा चाहतावर्ग खुप मोठा आहे. मराठी सिनेविश्वातली आघाडीची म्हणून प्रिया ओळखली जाते. बालकलाकार म्हणून तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. प्रियासोबत घडलेला हा एक किस्सा तुम्हा सर्वांना जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
वजनदार या सचिन कुंडलकर दिग्दर्शित सिनेमाचं शूटींग पाचगणी येथे सुरु होतं. पाचगणीतील एका हॉटेलमध्ये ‘गोलू-पोलू’ गाण्याचं शूटींग सुरु होतं. प्रिया आणि सर्व क्रू मेंबर्स आपापल्या कामात मग्न होते. शूटच्या दरम्यान अचानक प्रिया घाबरून पळाली होती.
प्रियाच्या जवळ माकडं आल्याने प्रिया ऐन शूटींग सुरु असतानाच घाबरुन पळाली आणि सेटवर एकच हशा पिकला. सेलिब्रिटी आणि त्यांचं शूटींग कसं सुरु असतं, तिथे काम कसं चालतं, त्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, फावल्या वेळेत ते कसे धम्माल करतात हे जाणून घेण्याची सामान्य आणि चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असते.