प्राजक्ता माळीच्या अडचणीत वाढ

प्राजक्ता माळी हिने केलेल्या मारहाणीच्या विरोधात फॅशन डिझायनर जान्हवी मनचंदा हिने ठाणे न्यायालयात धाव घेतली आहे. जान्हवीची तक्रार न्यायालयाने दाखल करून घेतली असून त्यात कलम ५०६ नव्याने दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.
२६ जून रोजी असलेल्या सुनावणीच्या वेळी प्राजक्ता माळी हिला न्यायालयात हजर राहावे लागेल, अशी माहिती मनचंदा हिचे वकील अॅड. सचिन पवार यांनी दिली. प्राजक्ताविरुद्ध मनचंदा हिने ५ एप्रिल रोजी ठाणे ग्रामीणच्या काशिमिरा पोलिस ठाण्यात तक्रार केली होती.