ABCD-3 चित्रपटामध्ये श्रद्धा-नोरानंतर ‘या’ अभिनेत्रीची एन्‍ट्री

रेमो डिसूजाच्‍या ‘ABCD-3’ या चित्रपटाचे शूटिंग पंजाबच्‍या अमृतसरमध्‍ये सुरू झाले आहे. आता या चित्रपटात आणखी एका अभिनेत्रीची एन्‍ट्री होणार आहे.

वरुण धवनसोबत या चित्रपटात श्रद्धा कपूरला घेण्यात आले आहे. श्रद्धासोबत नोरा फतेही दिसणार आहे. परंतु, आता या चित्रपटात आणखी एक अभिनेत्री दिसणार आहे.ही अभिनेत्री दुसरी कोणी नाही तर पंजाबी अभिनेत्री सोनम बाजवा आहे.चित्रपटात सोनमची भूमिका काय असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटात श्रद्धा पाकिस्तानी डान्सर बनली आहे. ती यूकेमध्ये शिकलेली असते. तर नोरा एक इंटरनॅशनल डान्सर बनलेली दाखवण्यात येणार आहे. वरुण धवन एक पंजाबी बॉयच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात शक्ती मोहन, वर्तिका झा, पुनीत पाठक, राघव जुयाल आणि धर्मेश येलांडे आणि अनेक इंटरनॅशनल डान्सर्सदेखील दिसणार आहेत.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like