शूटिंगदरम्यान ‘ही’ अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह

जवळपास तीन महिने सर्व शूटिंग बंद होतं. मात्र आता नियमावली आखत शूटिंगला सुरुवात करण्यात आली. तरीसुद्धा करोनाचा धोका हा कायम आहे. त्यामुळे आता मनोरंजन सृष्टीसमोर हे एक नवं आव्हान आहे.

नव्या स्वामीची कोरोना चाचणी नुकतीच करण्यात आली होती. तिचा रिपोर्ट आता पॉझिटिव्ह आल्याने तिने मालिकेची शूटिंग ताबडतोब थांबवली. गेल्या तीन-चार दिवसांपासून तिला डोकेदुखीचा त्रास होता. डॉक्टरांनी करोनाची चाचणी करण्याचा सल्ला दिल्यानंतर तिने चाचणी केली आणि तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

सध्या नव्याला  क्वारंटाइन करण्यात आलं आहे. मालिकेतील इतर कलाकार व क्रू मेंबर्स यांचीही चाचणी करण्यात येत आहे. ‘ना पेरू मीनाक्षी’ आणि ‘आमे कथा’ या तेलुगू मालिकांसाठी नव्या प्रसिद्ध आहे.

 

आलिया आणि महेश भट्टविरोधात गुन्हा दाखल

You might also like