ऐश्वर्यासह आराध्या उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल

अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक ऐश्वर्याची मुलगी आराध्या देखील १३ जुलै रोजी कोरोनाची लागण झाल्याचे समजले. या दोघी आतापर्यंत होम क्वारंटाइन होत्या. आता मात्र ऐश्वर्याला ताप आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या दोघींनाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, १२ जुलै रोजी महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दोघाना हे कोरोनाची लागण झाल्याचे माहिती ट्विट करुन दिली होती. आता त्यानंतर पाच दिवसांनी म्हणजेच आज काही वेळापूर्वीच अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक ऐश्वर्याची मुलगी आराध्या या दोघींनाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दोघींची करोना टेस्टही पॉझिटिव्ह आली होती. आज ऐश्वर्याला ताप आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या दोघींनाही नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, अमिताभ बच्चन ‘नेमके किती दिवस रुग्णालयामध्ये ठेवणार’? या संदर्भात अभिषेक बच्चनने टि्वट करून माहिती दिली होती कि, “मी आणि माझे वडिल किती दिवस रुग्णालयात राहणार ते सर्व डॉक्टरांवर अवलंबून आहे. प्रत्येकाने सावधगिरी बाळगून काळजी घ्यावी, कृपाकरुन नियमांचे पालन करा”.

You might also like