फिल्म इंडस्ट्रमधील बॅकग्राऊंड डान्सरला वरुण धवनचा मदतीचा हात

सद्या जगभर कोरोना महामारीने थैमान घातले आहे, त्यानंतर सुरु झालेल्या लॉकडाउनमुळे जवळपास तीन महिने शूटिंग बंद आहे. मात्र आता काही अटीशर्तींचे पालन करत मालिकांच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. शूटिंग बंद असल्याकारणाने चित्रपट सुर्ष्टीमध्ये बॅकग्राऊंडान्सर सारख्या काम करण्या अनेकांचे हाल होत आहेत, त्यांच्यासाठी बॉलिवूड अभिनेता वरुण धवन पुन्हा एकदा मदत करण्यासाठी पुढे आला आहे.

वरुण धवनने 200 बॅकग्राऊंडान्सरच्या अकाउंटमध्ये पैसे जमा केले आहेत. या गोष्टीचा खुलासा बॅकग्राऊंडान्सर राज सुराणीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केल्यामुळे झाला. डान्सर राज सुराणीने आपल्या पोस्टमध्ये याबद्दल बोलताना सांगितले की, ‘वरुणने गरजूंना मदत केली. यापैकी अनेकांना वरुणसोबत 3 डान्सबेस्ड सिनेमात काम केले आहे. या लोकांना घेऊन वरुण काळजीत होता. वरुणने त्यांना मदत करण्याचे वचन दिले होते. अनेक बॅकग्राऊंडान्सरकडे आई- वडिलांची औषध आणण्यासाठी, घराचे भाडे देण्यासाठीदेखील पैसे नव्हते’. या पोस्टमध्ये त्याने वरुण धवनचे आभार मानले आहेत. वरुणने याआधीही कोरोनाच्या विरोधातील लढाईसाठी लाखोंची मदत केली आहे.

आता लवकरच वरुण धवन सारा अली खानसोबत ‘कुली नंबर 1’ मध्ये दिसणार आहे. १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या डेव्हिड धवनच्या ‘कुली नं.१’ चा कॉमेडी रिमेक आहे. जुन्या चित्रपटात गोविंदा आणि करिश्मा कपूर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. तसेच विनोदी कलाकार परेश रावल, राजपाल यादव आणि जॉनी लिव्हर हे देखील दिसणार आहेत.

 

….म्हणून शूटींग सुरु असतांनाच प्रिया बापट घाबरून पळाली

You might also like