‘या’ अभिनेत्रीशी सिद्धार्थ चांदेकरचा साखरपुडा

नुकताच सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांचा मोजक्याच कुटुंबीयांच्या उपस्थितीत साखरपुडा पार पडला. सिद्धार्थनं साखरपुड्याचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत आयुष्यातील आनंदाचे क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

‘Welcome to our beginning’, असं कॅप्शन लिहित त्याने साखरपुडा समारंभातील काही फोटो पोस्ट केले. या फोटोंमध्ये ते दोघंही अगदी सुरेख दिसत आहेत. सोशल मीडियावरुन आपल्या नात्यातील या खास क्षणाची माहिती देणाऱ्या सिद्धार्थला चाहत्यांनीही शुभेच्छा दिल्या.

सप्टेंबर महिन्यात सिद्धार्थनं मितालीला प्रपोज केलं होतं. सिद्धार्थनं त्यावेळीही देखील मितालीसोबतचा फोटो शेअर करत तिला प्रपोज केलंय आणि तिनं होकारही दिला असं म्हणत आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीची नव्यानं ओळख आपल्या चाहत्यांना करून दिली होती.

View this post on Instagram

YES YES YES.❤️💯 #happyvalentines #tinypanda

A post shared by Mitali Mayekar (@mitalimayekar) on

महत्वाच्या बातम्या –

 

 

You might also like