अभिनेत्री श्रेनु पारिखनं राहुल महाजनच्या कानशिलात लगावली

भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळं चर्चेत असतो. ‘नच बलिये’च्या सेटवर टी.व्ही अभिनेत्री श्रेनु पारिखनं राहुल महाजनच्या कानशिलात लगावली आहे.

टी.व्ही अभिनेत्री श्रेनु पारिख आणि राहुल महाजन ही जोडी ‘नच बलिये’च्या ग्रँड प्रमियरमध्ये परफॉर्म करणार आहे. आपला परफॉर्मन्स इतरांपेक्षा हटके करण्यासाठी श्रेनुला राहुलच्या कानाखाली मारायची होती. मात्र, राहुलला मारण्यासाठी श्रेनुला संकोच वाटत होता. शेवटी राहुलनंच पुढाकार घेऊन तिला कानाखाली मारण्यासाठी प्रोत्साहन दिलं. राहुलनं समजवल्यानंतरच श्रेनुनं त्याच्या कानशिलात लगावली.

‘राहुलसोबत काम करताना खुप छान वाटलं. मात्र, त्याला मारणं हे माझ्यासाठी खुप कठिण होतं. मात्र, राहुलनंच मला प्रोत्साहन दिल्यामुळं मी हे करु शकले.’ असं श्रेनु म्हणाली. ‘नच बलिये’च्या नवव्या पर्वाचं सुत्रसंचालन सलमान खान करणार असल्याची चर्चा आहे.