प्रकाश राज यांनी ‘सिंघम’च्या आठवणींना दिला उजाळा

‘सिंघम’ हा चित्रपट २०११ मध्ये प्रदर्शित झाला. आज या सुपरहिट चित्रपटाला नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने अभिनेते प्रकाश राज यांनी ‘सिंघम’च्या संपूर्ण टीमचं कौतुक करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

प्रकाश राज यांनी आपल्या मुलासोबतचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये ते आपल्या मुलासोबत सिंघमची पोज देताना दिसत आहेत. “सिंघमला ९ वर्ष पूर्ण झाली. आता माझी सटकली. जयकांत शिक्रेला इतकं प्रेम दिल्याबद्दल प्रेक्षकांचे आभार. रोहित शेट्टी, अजय देवगन, काजल अग्रवाल, फरहाद सामजी, अजय अतुल, रिलायंस एन्टरटेंन्मेंट आणि सिंघमच्या संपूर्ण टीमला धन्यवाद.” असं ट्विट करुन त्यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

‘सिंघम’ हा अभिनेता अजय देवगणच्या करिअरमधील सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचे डायलॉग्स आजही तितकेच लोकप्रिय आहेत. ‘सिंघम’च्या यशामागे प्रकाश राज यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी या चित्रपटात जयकांत शिखरे ही खलनायक व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटात त्यांनी केलेला अभिनय वाखाणण्याजोगा होता. ‘सिंघम’मध्ये त्यांनी आपल्या अनोख्या शैलीत उच्चारलेले डायलॉग्स आजही प्रेक्षकांमध्ये चर्चेत असतात. ‘सिंघम’चं दिग्दर्शन रोहित शेट्टीने केलं होतं.

 

 

You might also like