तापसीला ‘पति, पत्नी और वो’च्या रिमेकमधून काढण्यामागे ‘या’ अभिनेत्याचा हात…?

‘पति, पत्नी और वो’चित्रपटाचा रिमेक येणार हे तर कन्फर्म झाले आणि तेव्हापासून हा चित्रपटामध्ये तापसी पन्नूची वर्णी लागली आणि अचानक तापसीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. तापसी आऊट झाल्यावर तिच्याजागी भूमी पेडणेकर हिला हा चित्रपट मिळाला.

आता आणखी एक बातमी आली आहे. त्यानुसार, तापसीला या रिमेकमधून काढण्यामागे अन्य कुणाचा हात नसून ता कार्तिक आर्यन याच्या मर्जीवरून हे सगळे घडलेय.चर्चा खरी मानाल तर कार्तिक आर्यन तापसीसोबत काम करण्यास कंफर्टेबल नव्हता. तापसी आपल्यापेक्षा मोठी स्टार आहे आणि ती चित्रपटात असल्यामुळे प्रमोशनपासून तर चित्रपटापर्यंत सगळीकडे ती आपल्यवर भारी पडेल, अशी चिंता त्याला होती. याच भीतीतून त्याने तापसीऐवजी भूमीचे नाव सुचवले आणि हा चित्रपट भूमीच्या झोळीत पडला.

महत्वाच्या बातम्या –

 

 

You might also like