अक्षय कुमारला हेलिकॉप्टरची परवानगी कशी दिली?

अक्षय कुमार हेलिकॉप्टरने नाशिकमध्ये आला होता त्यामुळे अक्षय कुमारचा हा दौरा वादात सापडण्याची शक्यता आहे. लॉकडाउनच्या काळात हेलिकॉप्टरला परवानगी व शहर पोलिसांनी दिलेला बंदोबस्त या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.

लॉकडाउनमध्ये सर्वजण रस्ते मार्गे प्रवास करत असताना अक्षय कुमार हेलिकॉप्टरने कसा आला? ग्रामिण हद्दीत आला असताना शहर पोलिसांकडून सुरक्षा कशी? रिसॉर्ट बंद असतानाही प्रवेश कसा मिळाला. यासारखे प्रश्न अक्षय कुमारच्या नाशिक दौऱ्यामुळे उपस्थित झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय हॅलिकॉप्टरने नाशिक दौऱ्यावर आला होता. त्रंबकेश्वर रोडवरील सपकाळ नॉलेजच्या हेलिपॅडवर त्याचं हेलिकॉप्टर उतरलं होतं. तसेच ग्रेप काउंटी रिसॉर्टमध्ये तो वास्तव्यास होता. अक्षय कुमारला या दौऱ्यासाठी नाशिक शहर पोलिसांकडून सुरक्षा मिळाली होती. नाशिकमध्ये मार्शल आर्ट अॅकेडमी किंवा निसर्गोपचार केंद्र सुरु करण्याच्या उद्देशानं पाहणी करण्यासाठी दौरा केला.

“मी डॉक्टर कुटुंबातील मुलगा आहे सर माझं हस्ताक्षर पाहून तुम्ही चकित व्हाल”

You might also like