‘दोस्ताना २’ मध्ये ‘या’ अभिनेत्रीची वर्णी?

प्रियांका चोप्रा, जॉन अब्राहम, अभिषेक बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला ‘दोस्ताना’ २००८ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाला गेल्याचवर्षी दहा वर्षे पूर्ण झाली. तेव्हापासून ‘दोस्ताना’चा स्वीक्वल येणार अशा चर्चा आहे. या चित्रपटासाठी जान्हवीपासून ते सिद्धर्थ कपूर, राजकूमार राव या सगळ्यांच्या नावाची चर्चा होती. आता हा चित्रपट आलिया भट्टच्या झोळीत येऊ शकतो असं म्हटलं जात आहे.
आलियाला ‘दोस्ताना २’ ची संकल्पना खूपच आवडली आहे. त्यामुळे ती लवकरच चित्रपटाला होकार देईल अशी माहिती ‘मुंबई मिरर’नं दिली आहे. लवकरच आलियाच्या नावाची अधिकृत घोषणा होईल अशी चर्चा आहे. राजकुमारला या चित्रपटासाठी विचारण्यात आलं होतं पण राजकुमारनं ‘दोस्ताना २’ ला होकार दिला की नाही हे अद्यापही गुलदस्त्यातच आहे.
महत्वाच्या बातम्या –