‘या’ कारणामुळे अभिषेकने मानले बीएमसीचे आभार

महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यानंतर काही वेळातच अभिनेता अभिषेक बच्चन यालाही कोरोना व्हायरसची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

अभिषेकने त्याच्या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी करण्याचे आणि जनतेला शांत राहण्याचे आवाहन केले. त्यामुळे बीएमसीने अभिषेकचे ट्विटरच्या माध्यमातून आभार मानले आहेत. ‘तुम्ही केवळ नियमांचे पालन केल नाही तर जनतेला शांत राहण्याचे देखील आवाहन केले त्यासाठी मनापासून तुमचे धन्यवाद. तुम्ही लवकर बरे व्हाल अशी आशा करतो’, असं ट्विट बीएमसीने केलं आहे.

आता समस्त बच्चन कुटुंबीयांची आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये ऐश्वर्या राय बच्चन, जया बच्चन आणि आराध्या यांचे एन्टीजेन टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे.कोरोना व्हायरसची लागण आतापर्यंत लाखो लोकांना झाली आहे. सध्या देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ८ लाखांहून अधिक झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात २४ तासांत सर्वाधिक २७ हजार ११४ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची वाढ झाली असून ५१९ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ८ लाख २० हजार ९१६वर पोहोचला असून मृतांचा आकडा २२ हजार १२३ झाला आहे.

आतापर्यंत ५ लाख १५ हजार ३८६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या २ लाख ८३ हजार ४०७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या व्हायरसच्या विळख्यात अनेक सेलिब्रेटी आणि त्यांच्या सोबत काम करणारे लोकं अडकल्याच दिसून येत आहे.

You might also like