अभिषेक बच्चनचे ट्रोलर्सला सडेतोड उत्तर

बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चन सोशल मीडियावर खूप ऍक्‍टिव्ह असतो. तो सतत काही फोटो किंवा पोस्ट चाहत्यांसाठी शेअर करत असतो. अनेकवेळा त्याला ट्रोल्सही करण्यात येते. परंतु अशा ट्रोलर्सला कशा पद्धतीने उत्तर द्यायचे हे अभिषेकला माहिती आहे. 

काही दिवसांपूर्वीच अभिषेकला एका यूझरने ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. यावर अभिषेकने गप्प राहण्या ऐवजी त्याला सडेतोड उत्तर देत त्याची बोलतीच बंद कली. त्याचे झाले असे की, ट्रोलरने त्याल “नेपोकिड’ असे म्हटले. यावर अभिषेकने त्याला सडेतोड उत्तर दिले.

तुझा चित्रपट कोणीही पाहणार नाही “नेपोकिड’, असे ट्‌विट एका यूझरने केले होत. याला उत्तर देत अभिषेक म्हणाल, “ओके ब्रो नेपोकिड? मी 44 वर्षांचा आहे, तर किडस्‌ कसा? काही लिहिण्यापूर्वी जरा विचार करावा, ही विनंती.

यावर युझरने पुन्हा ट्‌विट केले की, आपण एबीचे बेबी आहात नेपोअंकल. यावर अभिषेक सडेतोड उत्तर देत म्हणाला, असे आहे तर मोठ्यांचा सन्मान केला पाहिजे. आता अंकल म्हटले आहे तर आदराने बोल. तसेच मला आठवण करून द्यावीशी वाटते की, तुही कोणाचा तरी मुलगा आहेस.

You might also like