ट्रोल करणाऱ्याला अभिषेकचे भन्नाट उत्तर

केंद्र सरकारने आता आर्थिक व्यवहार सुरू करण्याबरोबरच विस्कळीत झालेली घडी पूर्वपदावर आणण्यासाठी नियम शिथिल केले आहे. लॉकडाउन वाढवत असतानाच केंद्र सरकारने अनलॉकच्या ५व्या टप्प्यात चित्रपटगृह सुरू करण्यास परवानगी दिली.
दरम्यान चित्रपटगृहे सुरु होणार हे ऐकून बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने ट्विट केले होते. पण त्याला या ट्विटमुळे सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.अनलॉकच्या ५व्या टप्प्यात चित्रपटगृहे सुरु होणार हे ऐकल्यावर अभिषेकने आनंदी होऊन ट्विट केले.
‘आठवड्यातील सर्वात चांगली बातमी’ असे त्याने ट्विटमध्ये म्हटले असून आनंदी असल्याचे इमोजी वापरले होते.अभिषेकचे हे ट्विट पाहून ट्रोलर्सने त्याला ट्रोल केले आहे. एका यूजरने ‘पण तरीसुद्धा तुला असं नाही वाटत का तू बेरोजगार राहणार आहेस?’ असे म्हणत ट्रोल केले होते. त्या यूजरला अभिषेकने उत्तर दिले आहे. त्याने उत्तर देत ‘ते तुमच्या हातात आहे. तुम्हाला आमचे काम आवडले नाही तर आम्हाला आमचे पुढचे काम मिळणार नाही. त्यामुळे आम्ही १०० टक्के देऊन काम करत असतो आणि चांगलच होईल यासाठी प्रार्थना करतो’ असे अभिषेकने म्हटले.
But aren't you still gonna be jobless? https://t.co/npe28AqBsc
— catnip (@complexmea) September 30, 2020
That, alas, is in your (the audiences) hand. If you don’t like our work, we won’t get our next job. So we work to the best of our abilities and hope and pray for the best. 🙏🏽
— Abhishek Bachchan (@juniorbachchan) September 30, 2020