अभिषेक बच्चन सर्वात जास्त घाबरतो ‘या’ व्यक्तीला

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’मध्‍ये आता बहुचर्चित बहिण भावाची जोडी दिसणार आहे. ही जोडी म्हणजे अभिषेक बच्‍चन आणि श्‍वेता नंदा-बच्‍चन यांची आहे. बहीण भावाची ही जोडी या शोमध्‍ये एकमेकांची गुपीत उघड करणार आहेत एवढे नक्‍की आहे.

करण रॅपीड फायर राउंडमध्‍ये अभिषेक बच्‍चनला एक प्रश्‍न विचारतो की, आई जया बच्‍चन की पत्‍नी ऐश्‍वर्या राय बच्चन या दोघींपैकी कोणाला जास्‍त घाबरतोस?, अभिषेक बच्‍चन आई  जया बच्‍चन असे उत्तर देत असताना बहीण श्‍वेता मध्‍येच ऐश्‍वर्या असे उत्तर देते. तेव्‍हा मात्र अभिषेक म्‍हणतो हा तुझा नाही माझा रॅपीड फायर आहे.

श्‍वेताला असाच एक प्रश्‍न विचारला जातो. अभिषेकची कोणती गोष्‍ट सहन करु शकतेस तेव्‍हा त्‍याची विनोद बुद्धी असे उत्तर येते.

महत्वाच्या बातम्या –

You might also like