कतरिना, सोनाक्षी, टायगरने सलमान खानचा मेहुणा आयुष शर्माच्या शरीरयष्ठी चे केले कौतुक..

सलमान खान आणि त्याचा मेहुणे आयुष शर्माचा ‘अंतिम’ सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात सलमान खान सरदारच्या भूमिकेत दिसणार आहे, तर आयुष शर्मा जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशनसह दिसणार आहे. टीझरमध्ये सलमान खान आणि आयुष शर्माचा फाईट सीन होता. या सीनमध्ये दोघेही शर्टलेस दिसत आहेत.

पण मजेची गोष्ट म्हणजे सलमान खानबरोबर आयुष शर्माचेही खूप कौतुक होत आहे. खरं तर, त्याने आपल्या फिटनेसमध्ये जबरदस्त सुधारणा केली आहे आणि त्यांच्या परिवर्तनाचे सोनाक्षी सिन्हा, कतरिना कैफ आणि टायगर श्रॉफ सारख्या कलाकारांनीही कौतुक केले आहे.

कैटरीना कैफ, टाइगर श्रॉफ, शिल्पा शेट्टी, अभिमन्यु दसानी, सोनाक्षी सिन्हा, वर्धन पुरी यांच्यासह अनेक स्टार्सनी आयुष्मा शर्माचे इंस्टाग्रामवर कौतुक केले आहे. बादशाह, अपारशक्ति खुराना, मनजोत सिंह, मनीष मल्होत्रा, सूरज पंचोली या कलाकारांनी व्हिडिओवर कमेंट करताना आयुष शर्माच्या परिवर्तनाचे कौतुक केले आहे. आयुष शर्मा यांनी 2018 मध्ये ‘लवयात्री’ चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याने गुजराती तरूणाची भूमिका केली होती.

या सिनेमात सलमान आणि आयुष हॉट दिसत आहेत. यासोबतच दोघांचे अनेक दमदार अ‍ॅक्शन सीन्सही पाहता येतील. यामुळेच सलमानचे चाहते या चित्रपटाविषयी खूप उत्सुक आहेत.

You might also like