‘ठाकरे’ चित्रपटातील ‘आया रे सबका बाप रे’ गाणं प्रदर्शित

ठाकरे हा चित्रपट येत्या २५ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास उलगडण्यात येणार आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयीची प्रेक्षकांमधील उत्सुकता वाढली आहे. त्यातच आता या चित्रपटातील ‘आया रे सबका बाप रे, गाणं नुकतचं प्रदर्शित झालं आहे.
या चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्धीकी याने बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका वठविली असून अमृता रावने माँसाहेब मीनाताई ठाकरे यांची व्यक्तीरेखा साकारली आहे. संजय राऊत प्रस्तुत व लिखित ‘ठाकरे’ हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजित पानसे यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या –