आमिरच्या आईचे कोरोना चाचणीचे अहवाल आले….. ; ट्विट करत दिली माहिती

आमिर खानच्या काही कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. खुद्द आमिरने सोशल मीडिया पोस्टद्वारे याची माहिती दिली होती.  पोस्टमध्ये त्याने त्याची आणि इतर कर्मचाऱ्यांची करोना चाचणी निगेटीव्ह आल्याचे म्हटले होते. तसेच त्याने आईला करोना चाचणीसाठी घेऊन जात असल्याचे सांगितले होते.

आता आमिरच्या आईचे करोना चाचणीचे अहवाल आले आहेत. ‘मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की माझ्या आईची करोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार’ असे आमिरने ट्विटमध्ये म्हटले आहे. आमिर खानने आईच्या करोना चाचणीचे अहवाल ट्विटरद्वारे सांगितले आहेत.

 

You might also like