ओटीटीवर प्रदर्शित होणार तब्बल 17 चित्रपट

अभिषेक बच्चनचा “लुडो’, संजय दत्तचा “टोरबाज’, भूमी पेडणेकरचा “डॉली किट्टी और वो चमकते सितारें’, नवाजुद्दीन सिद्दीकीचा “अकेला रात है’ हे बॉलिवूड चित्रपट त्यापैकी पुढील काही महिन्यांत थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असल्याचे निश्‍चित झाले आहे.यासह तब्बल 17 चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याची नेटफ्लिक्‍सने पुष्टी केली आहे. ज्यात सहा नवीन चित्रपट आणि दोन नवीन सीरीजचा समावेश आहे. हे थ्रिलरपासून रोमॅंटिक कॉमेडी ते हलके-फुलके नाटकांपर्यंतच्या विविध शैलींवर आधारित आहे. 

या यादीमध्ये यामी गौतम आणि विक्रांत मेस्सी अभिनीत “गिन्नी वेड्‌स सनी’ आणि “बॉम्बे रोज’ देखील आहे. या व्यतिरिक्त “काली कुही’ हा पंजाबमधील एका गावाच्या पार्श्वभूमीवर आधारित भयपट चित्रपट आहे.

यात शबाना आझमी, सत्यदीप मिश्रा, संजीदा शेख आणि रवी अरोरासारखे कलाकार आहेत. मनु जोसेफ यांच्या कादंबरीवर आधारित “सीरियस मेन’ हा चित्रपटदेखील ओटीटीवरही रिलीज होणार आहेत. या व्यतिरिक्‍त “गुंजन सक्‍सेना: कारगिल गर्ल’, “त्रिभंगा’, “क्‍लास ऑफ’, “एके वर्सेज एके’ “मिसमॅच्ड’, “ए सूटेबल बॉय’, “मसाबा मसाबा’, “बॉम्बे बेगम्स’ आणि “भाग बिनी भाग’ आदी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी या व्यासपीठावर प्रतीक्षा करत आहे.

 

You might also like