‘मान्यवर’च्या जाहिरातीत झळकणार ‘हा’ नवा चेहरा

‘मान्यवर’ या कपड्यांच्या ब्रँडसाठी विराटने बऱ्याच जाहिराती केल्या आहेत. या जाहिराती प्रेक्षकांना आवडल्यासुद्धा. आता विराटला टक्कर देण्यासाठी बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सज्ज झाला आहे. ‘मान्यवर’च्या नव्या जाहिरातीत विराटची जागा अभिनेता कार्तिक आर्यनने घेतली आहे.

या जाहिरातीत ‘मान्यवर’ची संगतशीर कपड्यांची नवी संकल्पना मांडण्यात आली आहे. ‘ग्रूमस्क्वाड’ची ही संकल्पना सगळ्यांना आपलीशी वाटणारी आणि उत्साही आहे.

याबद्दल कार्तिक म्हणाला, ‘चित्रपटात नवरदेवाच्या मित्राची भूमिका साकारल्यानंतर जाहिरातीतही ते साकारणं माझ्यासाठी मजेशीर बाब आहे. यात मजा आहे, मैत्री आहे, खोडकरपणा आहे. संपूर्ण ग्रूमस्क्वाडने एकासारखेच कपडे परिधान करून मित्राच्या लग्नात धमाल करणे, ही फारच छान बाब आहे. आता माझ्या ज्या मित्राचं लग्न ठरेल तेव्हा मी हेच करणार आहे.’

#GroomSquadByManyavar

Yaar ki shaadi mein yaaron ki apni khaas pehchan hoti hain! Celebrate all those moments with Kartik Aaryan and his coolest #GroomSquad in town.#Manyavar #ManyavarKartikAaryan #GroomSquadByManyavar

Posted by Manyavar on Tuesday, July 9, 2019