मराठी सिनेइंडस्ट्रीत झळकणार एक नवा चेहरा

मराठी सिनेइंडस्ट्रीत एक नवा मराठमोळा चेहरा सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. ती म्हणजे अपूर्वा कवडे. अपूर्वाने ‘मिस फॅब’ सौंदर्यस्पर्धेत ३रा क्रमांक पटकावत ‘ग्लॅमर’च्या दुनियेत पदार्पण केलं. आता चित्रपट व म्युझिक अल्बममध्ये आपलं कौशल्य दाखवण्यासाठी ती सज्ज झाली आहे.

‘शुभरात्री’ या चित्रपटात ती प्रमुख भूमिका करीत असून तिच्यासोबत मेहुल गांधी व शाहिद मल्ल्या महत्वपूर्ण भूमिकेत आहेत. वर्षा उसगावकर व अनुपसिंग ठाकूर सारख्या दिग्गज कलाकारांसोबत तिला काम करण्याची संधी मिळाली व तिच्या अनुभव संपन्नतेत भर पडली याबद्दल ती खूश आहे.

 

You might also like