एक नजर ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’च्या बॉक्स ऑफ‍िस कलेक्शनवर

विकी कौशल आणि यामी गौतमचा ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट मागील शुक्रवारी प्रदर्शित झाला.चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८.२० कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतर केवळ दोन दिवसामध्ये या चित्रपटाने २० कोटींपेक्षा अधिक कमाई केली

विशेष म्हणजे या कमाईमध्ये तिसऱ्या दिवशी वाढ होत हा आकडा १४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे एकंदरीत या चित्रपटाने ३४ कोटी रुपयांची कमाई केली आहे.या चित्रपटाचं २५ कोटी रुपयांचं बजेट होत. मात्र कमाईचा आकडा बघता या बजेटच्या रकमेची वसुली कधीच पूर्ण झाली आहे. येत्या दिवसांत कमाईचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –

 

You might also like