शेवंताच्या घरी आली एक लहान मुलगी; पाहा व्हिडिओ

शेवंता म्हणून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर .अपूर्वा नेहमीच सोशल मिडीयावरुन चाहत्यांशी संपर्क साधते. आता अपूर्वानेही तिचं युट्यूब चॅनेल सुरु केलंय .या माध्यमातून ती धम्माल व्हिडीओ घेऊन चाहत्यांच्या भेटीला येते.
लॉकडाउनच्या सुरुवातीच्या काळापासून जे कलाकार घरात होते त्यांनी निवांत न बसता सोशल मिडीयाच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम केले. यापैकीच एक आहे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर.’रात्रीस खेळ चाले’ मालिकेतील शेवंता म्हणून प्रसिध्द असलेल्या अपूर्वाने तिचे स्वत:चे यूट्यूब चॅनेल सुरु केले आहे.
या चॅनेलच्या माध्यमातून ती विविध मजेशीर भूमिका साकारत आहे. या निमित्ताने विविध भूमिका साकारण्याची तिची हौसही पूर्ण होत असल्याचं पाहायला मिळतय. आता चक्क ती बनली आहे लहान मुलगी. बडबडी जाई असं या भूमिकेचं नाव आहे. या भूमिकेतील नवा भागही प्रदर्शित करण्यात आला आहे.
खवचट जयश्री काकू म्हणून धम्माल उडवल्यालंतर आता अपूर्वाकडे आलीय cool लक्ष्मी सुद्धा अली होती. यात एका म्हाता-या पण कूल स्वभावाच्या या भन्नाट आज्जीची भूमिका अपूर्वाने साकारली होती .