‘या’ प्रसिद्ध मालिकेच्या सेटवर लागली आग, थोडक्यात बचावले कलाकार

‘कुमकुम भाग्य’ च्या सेटवर काल म्हणजेच १ ८ जुलै २०२० रोजी मोठा अपघात टळला आहे. शूटिंग सुरू असताना सेटवर आग लागल्याने एकच गोंधळ उडाला होता. ज्यानंतर मालिकेची पूर्ण टीम बिथरली होती. ‘कुमकुम भाग्य’चे शूटिंग मुंबईतील साकी नाका या परिसरात असणाऱ्या किलिक निक्सॉन स्टुडिओ  मध्ये सुरू होते.

यावेळी सेटवर अचानक आग लागली. दरम्यान यावेळी या कार्यक्रमातील मुख्य भूमिकेतील कलाकार सृती झा आणि शब्बीर अहलुवालिया  यांच्यासह संपूर्ण क्रू आणि इतर कलाकार उपस्थित होते. मात्र मोठी दुर्घटना टळल्यामुळे सर्वजण थोडक्यात बचावले आहेत.

सेटवर आग लागल्याचे कळताच सर्व कलाकार आणि क्रू मेंबर्सना तातडीने बाहेर काढण्यात आले आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुर्घटनेची सूचना मिळताच अग्निशमन दल देखील याठिकाणी वेळेत पोहोचले होते.

दरम्यान,काही दिवसांपूर्वी ‘कसौटी जिंदगी की मधील पार्थ समथान कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर किलिक निक्सॉन स्टुडिओ बंद ठेवण्यात आला होता. 3 दिवस स्टुडिओ बंद ठेवल्यानंतर स्टुडिओ सॅनिटाइझ करण्यात आला आणि त्यानंतर पुन्हा याठिकाणी काम सुरू करण्यात आले होते.

View this post on Instagram

A fire broke out on the sets of Kumkum Bhagya, earlier on Saturday, 18th July 2020. Thankfully, Shabir-Sriti & everyone else including all actors & crew members of the show are safe! 🙏🏻❤️ No casualties were reported. Property damage has occurred with some portion of the set being majorly affected, along with some makeup rooms. Shooting is expected to resume again from Sunday morning! – Thank you to all you guys for your concern about Shabir & for sending in love & blessings for his safety ❤️ #pankhabrigade – 🎥: Video footage from the sets! • #shabirahluwalia #sritijha #kumkumbhagya #rockstarfuggi #AbhiGya #कुमकुमभाग् #loncengcinta #ahkalbim #twistoffate #iniyaIrumalargal #alegedragostea #sindhooram #TiSha #rockstarabhi #abhitherockstar #TEAMSHABIR

A post shared by Team Shabir Ahluwalia (@teamshabira) on