आलिया आणि महेश भट्टविरोधात गुन्हा दाखल

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर आलिया भट्टवर नेटकऱ्यांनी चांगलाच निशाना साधला आहे. शिवाय घराणेशाहीचा वादही शमण्याचं नाव घेताना दिसत नाही आहे. आता महेश भट्ट आणि आलिया भट्ट विराधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

‘सडक २’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये कैलास मानसरोवर पर्वताचा फोटो वापरण्यात आला आहे. पर्वताच्या टोकावरती चित्रपटाचं नाव लिहिल्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचं म्हटलं जात आहे. कलम २९५ आणि१२० ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून येत्या ८ जुलै रोजी प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

दरम्यान, आलिया भट्ट स्टारर ‘सडक २’ चित्रपटाचं दिग्दर्शन महेश भट्ट यांनी केलं आहे. सिनेमा गृह बंद असल्यामुळे  चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. चित्रपटात पूजा भट्ट देखील मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. याव्यतिरिक्त चित्रपटात संजय दत्त आणि आदित्य रॉय कपूर यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सडक’ चित्रपटाचा ‘सडक २’ हा सिक्वल आहे.

‘कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही’

You might also like