गणेश आचार्य यांनी 98 kg किलो वजन कमी केले, कपिल शर्माने उडवला मजाक..

या आठवड्यात कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य, टेरेन्स लुईस आणि गीता कपूर पाहुणे म्हणून आहे होते. या भागाचा प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे, ज्यात प्रत्येकजण मजा करताना दिसत आहे. कपिल शर्मा या तिघांनी स्टेजवर बोलावून स्वागत केले.

“आचार्यजी, तुमचे वजन किती कमी झाले आहे?” असा पहिला प्रश्न गणेश आचार्य यांना विचारून कपिल शोची सुरूवात करतो. गणेश उत्तर देतो 98 किलो. कपिल शर्मा विनोदाने म्हणाले की तुम्ही दोन माणसे गायब केली आहेत. यानंतर कपिल गीता कपूरसोबत फ्लर्टिंग करण्यास सुरवात करतो. तो तिच्या सौंदर्याचे कौतुक करतो आणि त्या बदल्यात तिची प्रशंसा करायला सांगतो. यावर गीता कपूर उत्तर देते, कपिल, तू माझ्या नजरेत पाहा, तुला मी किती सुंदर आहे ते समजेल.

कपिल शर्माच्या शोमध्ये दर आठवड्याला नवीन पाहुणे येतात. शोमध्ये कृष्णा अभिषेक आणि भारती सिंग यांनी त्यांच्या कॉमेडीने सर्वांची मन लुभावली आहेत. याशिवाय सुमोना चक्रवर्तीची कामगिरीही बरीच मजबूत आहे.

You might also like