64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा
अवघ्या चित्रपटसृष्टीचं लक्ष लागलेल्या 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आहे. यंदाच्या 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत मराठीचा दबदबा पाहायला मिळाला. ‘कासव’ या मराठी सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कारांची शर्यत जिंकत अव्वल क्रमांकाचं ‘सुवर्णकमळ’ पटकावलं आहे. दिल्लीत येत्या 3 मे रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारांचं वितरण होईल.