अखिल भारतीय नाट्य परिषद ४१वा वर्धापनदिन सोहळा

अखिल भारतीय नाट्य परिषदेचा यंदा ४१ वा वार्धपाणदिन सोहळा साजरा होत आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री उल्हासदादा पवार ( माजी आमदार ) प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर,स्वागतोत्सुक मेघराजराजे भोसले (अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ) व ( अखिल भारतीय नाट्य परिषद पुणे शहर ) येत्या शनिवारी २५ मे २०१९ रोजी सायंकाळी ४:३० वा बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे.
नाट्यक्षेत्रात उत्तम अभिनय ,उत्तम दिग्दर्शन ,विनोदी कलाकार ,संगीतकार ,उत्कृष्ट नाट्य निमिर्ती ,पडद्यामागील कलाकार यांचा सन्मान होणार आहे या कार्यक्रमाला सहभागी रंगकर्मी कलाकार प्रवीण तरडे ,आस्ताद काळे ,सौरभ गोखले , शशांक केतकर , चेतन चावडा , आशुतोष वाडेकर ,जमील शेख ,विजय मिश्रा ,केतन क्षीरसागर , सुशांत शेलार , सिद्धेश्वर झाडबुके ,सक्षम कुलकर्णी ,केतन गोडबोले , संस्कृती बालगुडे , मधुरा देशपांडे ,शाश्वती पिंपळेकर ,अश्विनी कुलकर्णी संजीव मेहेंदळे ,कविता टिळेकर ,हेमांगी कवी आणि नैना आपटे आणि इतर क्षेत्रातील अनेक कलाकार ,मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे संकलन दिग्दर्शन विनोद खेडकर -विजय पटवर्धन ,निवेदन लेखन संजय डोळे,नृत्य दिग्दर्शन अश्विनी कुलकर्णी ,बहुरंगी मनोरंजन ,नाटक ,नाट्यगीते ,नाट्यपदे , प्रहसन इत्यादी या कार्यक्रमांमध्ये होणार आहे.